कोल्हापूर | ८ एप्रिल २०२५. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था.पुणे अंतर्गत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त “भारतीय संविधान अमृत महोत्सव” आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या “समाजिक समता सप्ताह” उपक्रमांतर्गत शासकीय शिष्यवृत्ती व कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी यशस्वीरित्या पार पडला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्देशानुसार आणि सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, वंचित, दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शासकीय योजना, शिष्यवृत्ती, वसतिगृह व इतर शैक्षणिक सुविधा यांची सविस्तर माहिती देणे.
कार्यक्रमात समता दूत म्हणून समाजकल्याण विभाग, कोल्हापूर मार्फत नेमणूक झालेल्या श्रीमती आशा रावण, श्री. किरण चौगुले, प्रतिभा सावंत, पूजा धोत्रे आणि सुनंदा मेटकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत योजनांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही या संवादात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुहास सपाटे होते. तर प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्रा.विरेन भिर्डी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बी.टेक व डिप्लोमा विभागातील विभागप्रमुख, तसेच SC/ST विद्यार्थी कल्याण कक्षाचे समन्वयकही या उपक्रमात सक्रीय सहभागी झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि समन्वयन हे प्रा. अशोक कोळेकर, समन्वयक – SC/ST/VJ/NT/SBC/OBC विद्यार्थी कल्याण कक्ष यांनी प्रा. महेश तिराळे , प्रा.स्वानंद कदम , प्रा.प्रवीण देसाई यांच्यासह समर्थपणे पार पाडले. श्री. अमित मोरे व श्री. शहाजी जाधव यांनी कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
या उपक्रमामार्फत संस्थेने शैक्षणिक समावेश, समान संधी आणि सामाजिक न्याय या मूलभूत मूल्यांना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाने समाजकल्याण विभागाचे आयुक्त श्री. सचिन साळे व उपआयुक्त श्री. उमेश घुले यांचे विशेष आभार मानले व समता दूतांचे मनःपूर्वक स्वागत केले. या कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.अभयकुमार साळुंखे, सचिवा प्रा. शुभांगी गावडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
शिष्यवृत्ती जनजागृती कार्यक्रम
