
Life Skills Development Training Program
श्री स्वामी विवकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ बापूजी साळुंखे इन्स्टिट्युट ऑफ इंजनिअरिंग अँड टेकनोलॉजी महाविद्यालयामध्ये लाईफ स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न
कोल्हापूर: येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पदविका महाविद्यालयामध्ये 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान “लाईफ स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम” विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये यशस्वीपणे पार पडला. यामध्ये TWJ संस्थेच्या प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तंत्रनिकेतनच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोहसीन फकीर यांनी ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर बोलताना ” तंत्रशिक्षणाबरोबरच परिणामकारक संवाद आणि नेतृत्व गुण यांचे उद्योग क्षेत्रामध्ये आज विशेष महत्त्व आहे” असे प्रतिपादन केले. नोकरी व व्यवसाय विश्वातील आव्हानांना सामोरे जाताना उपयुक्त असणारी कौशल्ये, SWOT विश्लेषण, देहबोली, मुलाखती आणि ॲप्टीट्यूड टेस्ट यासाठी यशस्वी तयारी, ग्रुप डिस्कशन,Resume आणि ईमेल इत्यादी मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमातून बहुमूल्य माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया तंत्रनिकेतनमधील अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांनी दिली.
BSIET चे संचालक विरेन भिर्डी यांनी मार्गदर्शन केले तसेच प्राचार्य डॉ सुहास सपाटे यांनी संयोजन केले. तंत्रनिकेतनच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या प्रमुख प्रा. प्रियांका खाडे यांनी समन्वयन केले यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.