Skip to content

Announcement : 

 

“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार” – शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे

SHRI SWAMI VIVEKANAND SHIKSHAN SANSTHA’S

(Affiliated to DBATU, Lonere) 

(Affiliated to MSBTE, Mumbai) 

DTE Code : 6468

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि एन आय आय टी फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि एन आय आय टी फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

‘विवेकानंद’–एनआयआयटी
फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार
कोल्हापूर : कौशल्य विकास, संशोधन क्षेत्राला चालना आणि रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मिती या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर आणि एनआयआयटी फाऊंडेशन, नवी दिल्ली यांच्यात परस्पर सहकार्याचा सामंजस्य करार करण्यात आला. आयबीएम टू स्किल्स – बिल्ड प्लॅटफॉर्मद्वारे तरुणांना कौशल्य निर्मितीच्या र संधी उपलब्ध करून देणे, कौशल्य विकासासाठी नवीन र अभ्यासक्रमांच्या निर्मितीची निरंतर प्रक्रिया राबवणे ही या सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये आहेत.

‘विवेकानंद’ तर्फे सचिवा प्राचार्या , शुभांगी गावडे आणि एनआयआयटी क फाऊंडेशनतर्फे दीपक कुमार त्रिवेदी य यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जू याप्रसंगी विवेकानंद कॉलेज, त रामकृष्ण परमहंस महाविद्यालय- त धाराशिव, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील महाविद्यालय- तासगाव,
दत्ताजीराव कदम आर्टस्, सायन्स, कॉमर्स कॉलेज- इचलकरंजी, राजे रामराव महाविद्यालय – जत, डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी – मिरज, सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग- कोल्हापूर, दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज- इचलकरंजी, डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी- कोल्हापूर यांनी महाविद्यालयीन स्तरावरील सामंजस्य करार केले. प्रास्ताविक प्रा. वीरेन भिर्डी यांनी केले. कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सीईओ कौस्तुभ गावडे यांचे
मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या अर्थ विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. एम. एस. हुजरे, प्राचार्य डॉ. जे. एस. देशमुख, प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, प्राचार्य डॉ. एस. एस. मणेर, आर. के. भडके, प्रा. डॉ. के. ए. कांबळे, प्रा. डॉ. सी. एस. बागडी उपस्थित होते. प्रा. सुदर्शन महा यांनी सूत्रसंचालन केले.